न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- समाजात आज जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती नाहीशी करण्याकरिता आपल्या थोर समाजसुधारकांनी आपल्याला जी शिकवण समस्त मानव जातीच्या कल्याणाकरिता दिली आहे त्याचा सदुपयोग करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मानवता टिकवली पाहिजे. संविधानामुळे आपला देश एक संघ आहे, अशा शब्दात सर्वच धर्मगुरूंनी आपले मत व्यक्त केले.
रमझान ईद निम्मित राष्ट्रीय एकात्मता आणि बंधूभाव कायम रहावा या उद्देशाने सर्व धर्मीय ईद मिलनाचा कार्यक्रम बोपोडी भाजी मंडई येथे जमातुल मुस्लेमिन बोपोडीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सर्व धर्म गुरूंनी आपली भूमिका मांडीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी ह. भ. प सचिन निकम, गुरुद्वारा ग्रंथी प्रमुख ग्यानी मुखत्यार सिंगजी, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अब्दुल रशीद मिफ्ताही यांना संविधान उद्देशिका फ्रेम गोदाई सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष विनोद दादासाहेब रणपिसे आणि मा. नगरसेवक मनीष आनंद यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, खडकी पोलीस स्टेशनचे पीआय ताम्हणे, क्राईम पीआय पाटील, अनिल पवार, मा. नगरसेवक श्रीकांत पाटील, मा. नगरसेवक ऍड. नंदलाल धीवार, लिंगायत समाजाचे प्रतिनिधी बसवराज, ऍड. रमेश पवळे, ऍड. विठ्ठल आरुडे, करीमलाला शेख, मैनुउद्दीन अत्तार, विशाल जाधव, मुसले, अर्चना कांबळे, ज्योती परदेशी, सुंदर ओव्हाळ, वसुधा नीरभवने, प्राजक्ता गायकवाड, इकबाल शेख, इसार कुरेशी, अंजुम इनामदार, महंमद शेख, साजिद शेख,अमित मुरकुटे, राजेंद्र भुतडा, अनिल भिसे, फिरोज मुल्ला, मोहन मस्के, जीवन घोंगडे, सुरेश पवार, के पी घागट, मिलिंद माने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुबेर पिरजादे, सूत्रसंचालन सादिक शेख आणि आभार डॉ. निसार खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुनाफ शेख, सलीम बेपारी, बाबाजान शेख, फारुख पिरजादे, शहाबुद्दीन काजी, बाबाजान सौदागर, रियाझ इनामदार, करीम शेख, नौशाद सौदागर, सादिक शेख, मुजीफ बुखारी, आयुब शेख, अबुल वाजिद, सिद्दिक पठाण, करीम तुर्क, अहमद मणियार इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
















