न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- दोघांनी मिळून सन २०२१ मध्ये निवासी प्लॉट खरेदी केला होता. दरम्यान फिर्यादीचा मित्र मयत झाला. त्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील पैशांच्या देणे-घेणेच्या वादातून मयताचा भाऊ आरोपी याने फिर्यादीला फोन करुन व्यावहारीक चर्चेकरीता आरोपी राहत असलेल्या सोसायटीच्या गेटसमोर बोलावून घेतले. आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या तोंडावर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या डोळयावर आणि डोक्यात डाव्या बाजूस, तसेच डाव्या हाताच्या दोन बोटांवर मारुन जखमी केले. आरोपी सोबतचे त्याचे इतर मित्र आरोपी २ ते ४ यांनी सर्वांनी मिळून फिर्यादीला त्यांच्या जवळील लाठ्या काठयांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३०/०४/२०२३) रोजी रात्री २०.३० च्या सुमारास आण्णाभाऊ साठेनगर, डुडुळगाव येथे घडली. फिर्यादी दिगंबर बाळासाहेब काटे (वय ३० वर्ष, च-होली) यांनी आरोपी विजय तारासिंग चव्हाण (वय ३८ वर्ष, डुडुळगाव), इतर साथिदार, अर्जुन मोतीराम राठोड, विनोद मोतीराम राठोड, आणि करण दामू राठोड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी १९२/२०२३ भा. दं. विकलम ३२४, ३२३, ५०४,३४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह कलम १३५ अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.