न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट माही वर्माने तयार केले. त्यात डॉ.देशमुख यांचा फोटो वापरला. आपण आयएएस अधिकारी असल्याचे त्यात म्हटले आहे. आपण मुंबईत राहत असल्याचे त्यात म्हटले आहे. फेसबुक बनावट अकाउंटचा फटका आता थेट पुणे जिल्हाधिकारींना बसला आहे. या प्रकारानंतर राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे.
सायबर चोरट्यांनी “माही वर्मा” या नावाने हे बनावट अकाउंट तयार केले आहे. त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा फोटो देखील पोस्ट करण्यात आले. या अकाउंटवरुन देशमुख यांच्या मूळ अकाउंटवरील अनेकांना “रिक्वेस्ट” पाठवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधी २ वेळा काही अज्ञातानी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा केले आहे. डॉ.राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसात याची तक्रार दिला आहे. यामुळे ही माही वर्मा नाव वापरणारी किंवा वापरणारा ठग कोण आहे? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकरींचा फोटो वापरल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. नागरिकांनी अशा बनावट अकाऊंटवर कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी पुन्हा केले आहे.


















