- युवकाच्या कुटुंबाला पन्नास लाखांची आर्थिक मदत करा..
- मा. नगरसेविका अनुराधा गोरखे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- संभाजीनगर येथील जलतरण तलावामध्ये संभाजी वाघमोडे (वय १७ वर्ष) या युवकाचा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या मृत्यूला महापालिका कर्मचारी व जलतरण तलावाचे व्यवस्थापक जबाबदार आहेत.
मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला मनपाने जबाबदारी म्हणून पन्नास लाखांची मदत करावी, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून यापुढे अशी घटना होणार नाही याकरीता पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक जलतरण तलावावर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी, असे या पत्रात नगरसेविका गोरखे यांनी म्हटले आहे.