न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२३) :- चिखलीतील नेवाळेवस्ती व हरगुडेवस्ती येथे संशयीत इसम दुचाकीवरुन येत चिखली पोलिसांना दिसुन आले. त्याला थांबवुन त्याच्याकडील दुचाकीची चौकशी केली. वाहन परवाना व दुचाकी मालकी संदर्भात त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते. अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची सॅक तपासली. त्यामध्ये दोन लॅपटॉप दिसुन आले. लॅपटॉपची देखील आरोपीने माहिती दिली नाही.
टिकम बिवाराम चंद (वय २५ वर्ष रा. सोळंकी डिस्ट्रीब्युटस्, सी/३९/४०,कुणाल प्लाझा, चिंचवड रेल्वे स्टेशन रोड, चिंचवड,; मुळ रा. शेहवाज ता.मारवाड जंक्शन जि.पाली, राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे.
चिखली पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी नेवाळेवस्ती येथून चोरली असल्याचे सांगितले. पुर्णानगर व जाधववाडी येथे कारची काच फोडुन त्यामधील लॅपटॉप व दुचाकीच्या हॅन्डलला लावलेला लॅपटॉप चोरल्याचे तपासात कबूल केले. चिखली पोलीस ठाणे गु.र.नं.३३६/२०२३ भादविक ३७९, लॅपटॉप चोरीबाबत चिखली पोलीस ठाणे गु.र.नं.३३८/२०२३ भादविक ३७९,४२७ व गु.र.नं.३२९/२०२३ भादवी कलम २७९ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले आहे. आरोपीच्या ताब्यातून २०,००० रुपये किंमतीची हिरो स्पेल्डर, ३०,००० रुपये किंमतीचा एच. पी. प्रो बुक-४४० जी-४ कंपनीचा सिल्वर रंगाचा लॅपटॉप, ४०,००० रुपये किंमतीचा डेल कंपनीचा काळया रंगाचा लॅपटॉप, ५०० रुपये किंमतीची एक काळया रंगाची लॅपटॉप बॅग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने गेल्या चार दिवसापुर्वी रामनगर, चिंचवड येथुन हिरो स्पेल्डर चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी ती जप्त केली आहे. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे.
ही कारवाई देहूरोड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त पदमाकर घनवट, चिखली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, पोहवा / ११३२ साफोरे पोहवा /५७२ पांढरे,पोहवा/९६४ नागरे, पोना/९६२ राठोड, पोना. १५४६/गायकवाड, पोना/१८१३ सुतार, पोना. १८५६/पिंजारी, या पथकाने केली असुन त्यांनी एकुण ४ गुन्हे उघडकीस आणले आहे.