न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- फर्म पार्टनर व फिर्यादीच्या मालकीच्या चिखलीगावातील १४ हेक्टर ४० आर जमिनीचे विकसन करताना आरोपी पाच जणांनी संगनमत केले. रिलायन्स होम फायनान्स व एल अॅन्ड हौसिंग फायनान्स या कंपन्यांकडून विजयालक्ष्मी ऊर्फ विजयालक्ष्मी डेव्हलपर्स या फर्मच्या संमतीशिवाय कर्ज घेतले.
फिर्यादीची मालमत्ता गहाण ठेउन संयुक्त विकसन करारनाम्याचा व कुलमुखत्यारपत्राचा भंग केला. मर्यादीपपेक्षा जास्त रक्कमेचे कर्ज घेउन सर्वसाधारण अधिकार पत्रान्वये दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करुन स्वतःच्या फायदयाठी एल अॅन्ड टी हौसिंग फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जापैकी ३१.०३ कोटी रुपयांचा रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे कर्ज टेक ओव्हर करण्यासाठी वापर केला. तसेच एल आय सी हौसिंग फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेपैकी फिर्यादी यांच्या संमती शिवाय ४५.४२ कोटी रुपये एल अॅन्ड टी हौसिंग फायनान्सचे घेतलेले कर्ज भरण्यासाठी वापरले, असे एकुण ७६.४५ कोटी रुपयांचा अपहार करुन विजयालक्ष्मी ऊर्फ विजयालक्ष्मी डेव्हलपर्स या फिर्यादीच्या फर्मची आरोपींनी फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ११/१२/२०१३ पासुन ते आजपर्यंत) वेळोवेळी चिखलीगाव, देहु आळंदी रोड या ठिकाणी गट नं ९०, १४ हेक्टर ४० आर जमिन येथे घडली.
फिर्यादी शांतीलालजी मोहनलाल कवर (रा. मुंबई) यांनी आरोपी ईश्वर कन्ट्रक्शन प्रा.लि व ट्रेड सेंटर अॅन्ड बिल्डर प्रा. लि चे संचालक तसे ईश्वर चंदूलाल परमार, महिला आरोपी, आनंद नवरत्न जैन, महिला आरोपी, नरेन किसन मकवाना यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३६२/२०२३ भा.द.वि कलम ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















