न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- दोघजण ज्वेलर्समध्ये आले. त्यांनी फिर्यादी यांना सोन्याचे पॉलीश केलेल्या सोन्याच्या ४२.२४० ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या चैन दिल्या. त्यावर बनावटी हॉलमार्क व बनावटी पावती फिर्यादीला दिल्या. फिर्यादीकडुन २,५०,००० रूपये रोख घेतले. नंतर ते दागिने खोटे निघाले. आरोपींनी फिर्यादी यांची फसवणुक केली.
हा प्रकार (दि.२८/०१/२०२३) रोजी दुपारी २.०० च्या दरम्यान वासुली फाटा, भांबोली येथील भिमाजी प्रभु लांडगे, रा. वालीफाटा यांच्या गाळ्यामध्ये आवंती ज्वेलर्स, ता. खेड जि.पुणे येथे घडला.
फिर्यादी ज्ञानेश्वर भाऊ लोंढे यांनी आरोपी अभीजीत बंडू गदळे, नितीन बालाजी काळे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २९९/२०२३ भा.द.वी. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















