न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- मनोरूग्ण फिर्यादीच्या मुलीशी आरोपीने जवळीक साधला. वर्षभरापूर्वी भाड्याच्या रूममध्ये तिच्या इच्छेविरूध्द जबरदस्ती करीत तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच मार्च महिन्यात येलवडीमध्ये मुलीचा मानसिक आजाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला.
तेव्हा फिर्यादी व त्यांचे पती हे आरोपीला कॉल करून ‘तू आमचा विश्वासघात केला आहे’ असे म्हणाले. आरोपीने फिर्यादी व त्यांचे पती तसेच मुलगा यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला त्याची आरोपी पत्नी हिने मदत केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार मे २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान निगडी व येलवडी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी माणिक नानाभाऊ होरे, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ३३५/२०२३ भा.दं.वि. कलम ३७६ (२) (एफ) (एल) (एन), ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे.
















