न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्रातील २८८ विधानसभा प्रमुखांची घोषणा केली. पिंपरी विधानसभेसाठी युवा, उच्चशिक्षित चेहरा अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे.
अमित गोरखे यांचे MBA,MA एवढे शिक्षण असून त्यांचा शांत व संयमी स्वभाव, उच्च शिक्षित इमेज व पिंपरी विधानसभा क्षेत्रात असलेला चांगला संपर्क यांचा फायदा पक्षाला नक्की होईल. नुकतीच त्यांनी पिंपरी विधानसभा क्षेत्रात वीर सावरकर यात्रा भव्य व यशस्वी केली होती.
चिंचवड विधानसभा क्षेत्रात माजी नगरसेवक काळूराम बारणे, तर शिरूर लोकसभा प्रमुख म्हणून आमदार महेश लांडगे तर मावळ लोकसभा प्रमुख म्हणून माजी आमदार बाळा भेगडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.












