- उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख नेमका कोणाकडे?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला नाही. काही जण निवडणूक न लढता मैदानाच्या बाहेर राहिले, हे चुकीचे होते, आता तरी तोंड उघडा, चुकीच्या कामांविरोधात आक्रमकपणे बोला, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केला.
महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वत: उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील कारभाराची चिरफाड करत भाजपच्या स्थानिक नेत्यांना ‘टार्गेट’ केले. त्यानंतरही राष्ट्रवादीला अपयश आले. केवळ ३७ नगरसेवक निवडून आले.
पवार यांनी सोमवारी (दि. १९) नवनिर्वाचित ३७ नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन आणि निवडणुकीच्या पराभवाच्या कारणांची चर्चा केली करत आढावा घेतला. विरोधी पक्षनेते पदासाठी आक्रमक चेहरा देणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले.
काही पदाधिकाऱ्यांनी प्रचार न केल्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. चुकीच्या कामाला विरोध करा, त्याविरोधात आवाज उठवा, असे आदेश दिले. गटनेता निवडीबाबत चर्चा झाली असून लवकरच त्याची निवड केली जाईल.
– योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)…












