- जेसीबी चालकास मारहाण आणि धमकावत काम बंद पाडले…
सुरज करांडे – प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जानेवारी २०२६) :- चिंबळी ग्रामपंचायतीच्या ड्रेनेजच्या कामाच्या ठिकाणी चाकूचा धाक दाखवून काम बंद पाडत जेसीबी चालकास मारहाण केल्याची गंभीर घटना सोमवारी (दि. १९) रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत फिर्यादी स्वप्निल नामदेव लोखंडे (रा. चिंबळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सूर्यकांत कटिंग व सुजित बोराडे यांनी चाकूचा धाक दाखवून काम थांबवले. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी मारहाण केली, त्यात चाकूने वारही करण्यात आला.
दोन्ही आरोपी अद्याप अटकेत नसून पुढील तपास म.पो.ह.वा. म्हस्के करीत आहेत.











