- पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक निर्बंध व शाळा अर्धदिवस बंद राहणार..
- वाहनचालक आणि पालकांमध्ये नाराजी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जानेवारी २०२६) :- ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. शुक्रवारी २३ जानेवारी रोजी ही स्पर्धा बालेवाडी येथून सुरू होऊन पिंपरी-चिंचवड हद्दीतून जाणार असल्याने स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
परिणामी सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पनवळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एमआयडीसी, काळेवाडी, भोसरी एमआयडीसी, यशवंतनगर व त्रिवेणीनगर परिसरातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या परिसरातील सर्व शासकीय व खासगी शाळा दुपारी १२ वाजल्यानंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अचानक जाहीर झालेल्या या निर्णयामुळे पालक व नोकरदार नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, स्पर्धेच्या नियोजनात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा पुरेसा विचार झाला नसल्याची टीका केली जात आहे.












