न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- जी-२० च्या पार्श्वभूमीवर डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाची तिसऱ्या बैठकीच्या अनुषंगाने पुणे येथील हॉटेल जे डबल्यू मॅरीएट येथे जी-२० परिषदेमध्ये विविध देशांच्या प्रतिनिधींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलला जपान, चीन, भूतान, झांबिया, नेपाळ आदी देशांच्या प्रतिनिधींनी तसेच भारत सरकारच्या विविध मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी भेटी दिल्या.
यावेळी मपाच्या वतीने अभिजित पाठक, अनुराग तिवारी, आनंद सिंग ठाकूर, बिनिश सुरेंद्र, सुरभी सिंह आदींनी मनपा स्टॉलला भेट देणाऱ्या प्रतिनिधींना मनपाच्या डिजिटल उपक्रमांची माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना सेवा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा करीत असलेला उपयोग खरोखरच आश्वासक असल्याची भावना यावेळी विविध देशांच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच मनपा वापरत असलेल्या डिजिटल सेवा आपल्या देशात देखील कश्याप्रकारे वापरता येतील याबाबत देखील प्रतिनिधींनी माहिती घेतली.












