न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- अज्ञात वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन, हयगयीने चालवुन ३५ ते ४० वर्षे वयोगटातील पादचारी अज्ञात इसमास धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
अज्ञात वाहनावरील चालक त्याच्या मृत्युस कारणीभुत झाला. तसेच पोलीसांना अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरुन पळुन गेला. मयताच्या अंगात काळया रंगाचा फुल बाहयाचा शर्ट, काळया रंगाची साधी फुल पँट, पायात काळया रंगाचा सँडल आहे.
ही घटना (दि. २६) रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास औंधकडुन रक्षक चौकाकडे जाणा-या बीआरटी मार्गावर घडला. सांगवी पोलिसांनी २९७/२०२३. भा. दं.वि. कलम २७९,३३८,३०४ (अ). मो. वा. का. कलम १८४.११९/१७७.१३२(१) (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.












