न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- थेरगाव येथील हेडगेवार पूल, नदीपात्रा लगतच्या अनधिकृत बांधकामांवर (दि. २८) रोजी महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये एकूण तीन ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांचे एकुण क्षेत्रफळ अंदाजे २५,३८६.०० चौ. फुट, निष्कासित करण्यात आले आहे. ही कारवाई आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशान्वये शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे यांच्या अधिपत्याखाली महापालिका धडक कारवाई पथकामार्फत २२ एम.एस.एफ. जवान, ०६ मजूर, ०१ जेसीबी, ०२ डंपर यांच्या सहाय्याने करण्यात आली.












