- पोलिसी खाक्या दाखवताच डाव फसला; अनं सपशेल शरण आला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- स्वतःच्या मुलीचा अपहरणाचा बनाव करुन सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपी जावयास वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सहा तासात अटक करून दोन अपहारीत मुलींची सुटका केली आहे. सचिन मोहीते असे आरोपी जावयाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दि. ३०) रोजी ०२.३० वा सुमा. गस्त करीत असताना रहाटणीतील कोकणे चौकात त्यांना काही महीला व पुरुष घाई गडबडीत गोंधळलेल्या अवस्थेत जाताना दिसुन आले. त्यांना थांबवुन विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, सारीका या त्यांची आई पुष्पा यांच्यासोबत राहण्यास असुन त्यांच्या लग्न झालेल्या दोन बहीणी मुलांसोबत रक्षाबंधनासाठी रहाटणी येथे आल्या होत्या. त्यातील त्यांची बहीण शितल यांची मुलगी वय १५ वर्ष व सारीका यांची मुलगी वय ०२ वर्षे या राखी खरेदी करण्यासाठी (दि. २९) रोजी रात्री ८.०० च्या सुमारास घराच्या बाहेर गेल्या होत्या. त्या दोघीही त्या वेळेपासून दिसून आल्या नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ८४९ / २०२३ भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मुलींच्या वर्णनाबाबत नियंत्रण कक्ष येथे माहीती देवून ब्रॉडकास्ट करण्यात आले.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी यांच्या घरातील सर्व व्यक्तीची चौकशी केली. त्यावेळी अपहरत मुलीचे वडील सचिन मोहीते हे हजर होते. त्यांनी फिर्यादी प्रमाणेच हकीकत सांगीतली होती. ते सदर घटनेची माहीती मिळताच वाघोली येथुन आल्याचे पोलिसांना सांगीतले. तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी सदर अपहरत मुली ज्या रस्त्याने बाहेर पडल्या होत्या तेथील सिसीटीव्ही फुटेज पाहणी व स्थानिक नागरीक तसेच दुकानदारांकडे चौकशी करणे सुरु केली. या दरम्यानचे काळात सचिन मोहीते हा कोणास काहीएक न सांगता चालवित असलेली कार सर्व्हिसींगसाठी सोडण्यासाठी जात असल्याचे सांगुन कोठेतरी निघुन गेला होता. अपहरत मुलगी हीची आई शितल यांनी सकाळी १०.०० वा. सु चौकशी करीत असलेल्या पोलीस अधिका-यांना असे सांगीतले की, फिर्यादी सारीका यांचा सुमारे ०३ महीण्यापुर्वी गहाळ झालेल्या मोबाईल नंबर वरुन त्यांना व त्यांचे पति सचिन मोहीते यांच्या मोबाईलवर सकाळी ०७.१५ वा सुमा फोन आला. त्यावरुन बोलणारे व्यक्तीने ‘तुमच्या मुली सुखरुप पाहीजे असतील तर पोलीसांना काही न सांगता १० लाख रुपये दया नाहीतर तुमच्या मुलींचे बरेवाईट करेन’ अशी धमकी दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी सदर फोनवर आपले बोलणे झाले अथवा आपल्या पतिचे बोलणे झाले याबाबत विचारले असता त्यांनी पति सचिन मोहीते याचेच बोलणे झाले आहे, असे सांगीतले. या दरम्यान सिसीटीव्ही पाहणी करीत असणा-या टिमला सदरच्या मुली घरातुन बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येवुन कोणत्यातरी कारमध्ये बसून जाताना दिसल्या. सदरची कार सचिन मोहीते चालवित असणा-या कारचे वर्णनाशी मिळती जुळती होती. त्यामुळे सदर प्रकारात सचिन मोहीते यांना काहीतरी माहीती असुन ते जाणीवपूर्वक कुठेतरी निघुन गेले असल्याचा संशय पोलीसांना आला.
सचिन मोहीते याच्या मोबाईल फोनचे लोकेशनद्वारे माहीती घेतली असता तो पुन्हा वाघोली येथे गेल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकातील पोलिसांनी तात्काळ वाघोली येथे जावुन सचिन मोहीते याला तांत्रीक तपासाद्वारे ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदर दोन्ही मुलींचे अपहरण हे त्यांची सासु पुष्पा (रा. रहाटणी) यांना भिती दाखवून त्यांच्या बँकेत असणारे जंगम मालमत्तेतील १० लाख रुपये मिळविण्यासाठी अपहरणाचा बनाव केल्याचे सांगीतले. त्यानंतर त्या दोन्ही मुली कोठे आहेत याबाबत विचारणा केली असता त्याने सांगीतले की, मी मुलींना वाघोली येथे एका ठिकाणी ठेवले असून त्यांना सकाळी १०.०० वा नंतर वाघोली येथुन निघुन मनपा पुणे येथे येण्यास सांगीतले होते, असे सांगीतले. त्यामुळे लागलीच मुली ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता मुली मिळुन आल्या नाहीत. त्यानंतर सदर मुली पीएमपीएमल बसने प्रवास करीत मनपा पुणे येथे पोहोचतील या हेतुने सर्व अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी जावन थांबले. प्रवासाला लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ झाला तरी मुली मनपा पुणे येथे पोहोचल्या.नाहीत. त्यामुळे चिंता वाढत गेली. गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडकडील ०३ पथके पुणे मनपा येथे रवाना करणेत आले. पीएमपीएमल व्यवस्थापन यांच्याशी बोलून चालक, वाहक यांचे वॉट्सअप ग्रुप अस्तित्वात असतील तर त्यावर दोन्ही मुलींचे फोटो टाकुन जर त्या प्रवास करताना मिळुन आल्यास ताब्यात घेण्याबाबत कळविले. दुपारी १२.३० च्या सुमारास सदर मुली पीएमपीएमल बसने मनपा पुणे येथे आल्या. पोलिसांनी त्यांना ओळखून सुखरुप ताब्यात घेतले.
आरोपी सचिन मोहीते याने सदरचा गुन्हा हा सासु पुष्पा यांच्याकडुन १० लाख रुपयांची खंडणी वसुल करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयात भादविक ३६४ (अ), ३८५ चा अंतर्भाव करण्यात आला आहे. आरोपी सचिन मोहीते याला गुन्हयात अटक करुन त्याच्याकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असून गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि- २, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि रोहीत दिवटे, सपोफो बाबाजान इनामदार, सपोफो. राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. अतिश जाधव, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. भास्कर भारती, पोशि अजय फल्ले, पोशि रमेश खेडकर, पोशिकतेय खराडे, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) तसेच गुन्हे शाखा युनिट नं.०४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. शंकर आवताडे, पोउपनि रायकर व अंमलदार यांनी मिळून केली आहे.







![[रहाटणी] :- स्वतःच्याच मुलींचे अपहरण करुन सासुकडे मागितली दहा लाखांची खंडणी..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/173597e7-4330-4cd3-8265-4afc222e81c2-90x60.jpeg)
![[रहाटणी] :- स्वतःच्याच मुलींचे अपहरण करुन सासुकडे मागितली दहा लाखांची खंडणी..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/08/cb53f061-3f2c-4e4e-9a79-7afa46461964-90x60.jpg)



