न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- आकुर्डी येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे राज्य हेळवे समाजाचा एकता मेळावा आज सोमवार (दि. ८) रोजी संपन्न झाला. राज्यभरातून मोठ्या संख्येने हेळवे समाज बांधव मेळाव्यास उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार महेश लांडगे, बसवाभृंगेश्वर शिवाचार्य महाराज, हेळवे सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष शरणू उकली, उपाध्यक्ष नागेश हेळवार, मल्लिकार्जुन बी एच हेळवार, शरणाप्पा हेळवार,बाबू हेळवर, व्यंकटेश बेहरामडगी, राज्य कबड्डीपटू सोनाली हेळवर, भटक्यांची भटकंती पुस्तकाचे लेखक सूर्यकांत भिसे, नगरसेवक जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते माऊली सूर्यवंशी, साहेब अण्णा हेळवर, परशुराम बसरकोटी, आण्णप्पा कलमाडी आदी उपस्थित होते. या प्रसंगी हेळवे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शिवाचार्य महाराज म्हणाले, “महाराष्ट्र राज्यातील हेळवार समाज हा कष्टकरी समाज असून समाज बंधू आणि भगिनीनी अनेक क्षेत्रात आपापल्या कर्तृत्वाने यशाचे शिखर गाठले आहे. आज राज्यभरातून येथे जमलेल्या सर्व बांधवानी ह्यापुढे सामाजिक क्षेत्रात थोडे का होईना योगदान देण्याचा संकल्प करायचा आहे. त्यामुळे समाजातील दुःख कमी होण्यासाठी तुमची मदतच होईल.”
अध्यक्ष शरण उकली म्हणाले,” राज्यात हेळवे समाज अनेक जिल्ह्यात व तालुक्यात पसरलेला आहे. ह्यापुढे समाज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे कार्य हेळवे समाज संस्था करणार आहे.”
सदरच्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, अमित डांगे, अमोल कानु, संतोष चव्हाण यांनी केले. विशेष परिश्रम गणेश कन्नड, सतीश कलमाडी, प्रदीप हेळवर, महेश पवार, रवी हेळवर, अमोल हेळवर, नंदू हेळवर, बसवराज कोळी, कुमार उलाप्पा हेळवर, धर्मानां हेळवर, राजू तेलंगि यांनी केले.










