- कोणत्याही परीस्थितीत काळेवाडी परिसरातून पार्थ पवार यांना लाखांचे मताधिक्य मिळवून देणारच
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल) :- कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारासाठी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर पायाला जशी भिंगरी बांधावी, त्याप्रमाने अत्यंत जलदरित्या मतदारांशी संवाद साधत आहेत.
प्रचारादरम्यान तापकीर काळेवाडीतील श्रीनगर, वृंदावन काॅलनी, गुरूकुल काॅलनी परिसरात घरोघरी जाऊन, मतदारांना निवडणुकीत घड्याळ या चिन्हा समोरील बटण दाबून उमेदवार पार्थ पवार यांनाच प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे, असे आवाहन करीत आहेत. त्यांच्या या मोहिमेत युवा नेते सागर तापकीर, कार्यकर्ते व परिसरातील नागरिकही सहभागी झाले आहेत.
कोणत्याही परीस्थितीत काळेवाडी परिसरातून पार्थ पवार यांना लाखांचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी तापकीर हे बाह्या सरसावून जोमात प्रचार करीत आहेत. त्यामुळे काळेवाडी परिसरात पार्थ पवार यांना प्रचारासाठी जास्त परिश्रम घेण्याची आवश्यकताच नसून, त्यांचे काम सोपे होत आहे.










