न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर लहूजी शक्ती सेनेत भोसरी एमआयडीसी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या शिला गायकवाड, उद्योजिका मालन पारधे, सामजिक कार्यकर्त्या छाया शिंदे, सरोज चटके, नेहरूनगर येथील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गायकवाड यांसह असंख्य महिला आणि बांधवांनी नुकताच प्रवेश केला.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक, अध्यक्ष लहूश्री विष्णू कसबे यांच्या प्रेरणेतून तसेच प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता जगताप, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट यांच्या मार्गदर्शनातून हा पक्ष प्रवेश करण्यात आला, अशी माहिती संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे.
याप्रसंगी शहर कोअर कमिटी शहराध्यक्ष लहू अडसूळ, शहर सचिव ज्ञानेश्वर चव्हाण, कार्याध्यक्ष शंकर खवळे, उपकार्याध्यक्ष मधुकर तोरड, देहूरोड शहराध्यक्ष बाळू कुचेकर, मोरे वस्ती विभाग महिला अध्यक्षा शारदा घडसिंग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.













