- प्रकार निदर्शनास आल्यामुळे घातपात टळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- चिंचवड स्टेशन येथील दळवीनगरच्या पुलाखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावर दगडं ठेवल्याचा धक्कादायक प्रसंग उघडकीस आला आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता टळली आहे.
रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी ट्रॅक मेंटेनन्स टेस्टिंगच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. हा प्रकार दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडला. रेल्वे पोलिसांनी दगडं काढले आहेत. रेल्वेचा प्रवास सुरु आहे. ही दगडं कोणी ठेवली याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.


















