न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२३) :- एकवीरा गडावर चैत्र यात्रा व नवरात्र यात्रा काळामध्ये गर्दी होत असते. सध्या पायरी रस्ता अरुंद असल्याने कोंडी होते. भविष्यात चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ नयेत यासाठी गडावर जाण्यासाठी व खाली उतरण्यासाठी दोन वेगळे मार्ग होणे गरजेचे आहे.
पुरातत्व विभागाने भाविकांची सुरक्षा ध्यानात घेत सहकार्य करावे; यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी लोणावळ्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
नवरात्र उत्सव काळात भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे याकरिता जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून तयारी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून काही सूचना दिल्या असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.















