- तालुक्यातील ४३ गावांतील यांना मिळाली संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- मावळ तालुक्यातील ४३ गावांतील पोलिस पाटील नेमणुका करण्यासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी ३० गावांतून अर्ज आले होते. त्यासाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये २८ जण उत्तीर्ण झाले. त्यांची यादी मावळचे प्रांत सुरेंद नवले यांची पत्राद्वारे जाहीर केली. १५ जागा रिक्त राहिल्या आहेत.
तालुक्यातील ४३ गावांतील पोलिस पाटील पदासाठी भरती जाहीर झाल्यानंतर गावोगावी या पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी वाढली होती. राजकीय पदाधिकारी ते अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. घेण्यात आलेल्या परीक्षेत २८ जण पास झाले तर दोनजण नापास झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी मावळचे प्रांत सुरेंद नवले यांनी पत्राद्वारे जाहीर केली. १५ जागा रिक्त राहिल्या आहेत.
पोलिस पाटील पदासाठीची यादी पुढीलप्रमाणे:-
आंबी : माधुरी जाधव, आंबेगाव: सारिका राजिवडे, आतवण – संतोष मरगळे, आपटी – गणेश कोकरे, आपटी गेव्हंडे – स्पनिल खंडू प्रियंकाळे, कातवी: शीतल चव्हाण, कुणे नामा: दीपाली उंबरे, कुसगाव पमा:शर्मिला केदारी, कुसगाव बुद्रुक : प्रियंका घिरे, खामशेत : जनार्दन जाधव, घोणशेत : नीलेश लंके, चांदखेड : तेजस कांबळे, तुंग : बाळू मरगळे, दुधीवरे : रोहिदास कोशिरे, दारूब्रे : सार्थक वाघोले, पाचाणे पूजा कालेकर, बोरज : दिनेश केदारी, बोरवली : सीमा शेलार, ब्राम्हणवाडी बौर : अश्विनी दळवी, भडवली : अमित घारे, महागाव : लहू पडवळ, येळसे : सतीश ठाकर, वडेश्वर : किरण वसंत वाजे, वलवन : अक्षदा देशमुख, वेल्होळी : पूजा परचंड, शिलाटने : चंद्रकांत आहिरे, सदापूर : तुषार ढाकोळ.


















