न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 ऑक्टोबर 2023) :- युवा नेते शुभम चंद्रकांत नखाते युवा मंच आयोजित ‘रहाटणी नवरात्र महोत्सव २०२३’ सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या भव्य रास दांडियास दांडिया प्रेमींनी गर्दी केली.
प्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजापुरची आई तुळजाभवानी ची १७ फुटी मुर्ती दर्शनाकरीता देखाव्याच्या स्वरुपात साकारण्यात आली होती. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे उद्घाटन चिंचवड विधानसभा आमदार श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या शुभहस्ते पुष्पहार व श्रीफळ फोडुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
सदर कार्यक्रमास आमदार उमाताई खापरे, नगरसेवक शतृघ्न बापू काटे, मोरेश्वर शेडगे, बाबासाहेब त्रिभुवन तसेच नगरसेविका मिनल यादव, निर्मला कुटे आदि मान्यवरांच्या व प्रभागातील नागरीकांच्या शुभहस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
सर्व दांडिया प्रेमींनी मनसोक्त दांडियाचा आनंद लुटला. सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार. याप्रसंगी गरबा व दांडिया नृत्य यात विशेष प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. सर्वोत्तम गरबा, सर्वोत्तम दांडिया व सर्वोत्तम पोशाख या प्रकारे कलाकारांचा गौरव करण्यात आला.

















