न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२३):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मोरवाडी येथे दिव्यांग भवनात अडथळा विरहीत रचनेची स्थापत्य व विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या वाढीव खर्चास तसेच भक्ती शक्ती उद्यान येथील राष्ट्रध्वज फडकविणे चालन देखभाल दुरूस्ती करणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दापोडी हुतात्मा भगतसिंग शाळा इमारतीचे विस्तारीकरण अंतर्गत विद्युत विषयक कामे करणेकामी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ गवळी नगर येथील शास्त्री चौक परिसर, गणेश कॉलनी व इत्यादी ठिकाणचे पेव्हिंग ब्लॉक सुधारणा करणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर व इत्यादी ठिकाणचे रस्ते विकसित करणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील हरगुडेवस्ती पवारवस्ती मुख्य रस्त्यांवर सीडी वर्क (पाईप कलव्हर्ट) बांधणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेत भागात किवळे, शिंदेवस्ती व गुरूद्वारा परिसरात खडीमुरूम व बीबीएम पद्धतीने रस्त्यांचे चर, खड्डे भरणेकामी तसेच प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडेवाडी मोशी मधील एमएनजीएल विद्युत विभाग / जलनि:सारण पाणीपुरवठा तसेच रस्ते खोदकामास परवानगी दिलेल्या सेवावाहिन्यांचे चर बीबीएम पद्धतीने बुजविणेकामी, परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
चिखली सेक्टर क्रमांक १७ व १९ येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ई.डब्ल्यु.एस) गृहप्रकल्पात फुटपाथ विकसीत करणेकामी तसेच गृहप्रकल्पामधील भाजीमंडई आरक्षणाजवळील मोकळी जागा विकसीत करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कु. गायत्री संजय भालेराव हीने बर्लिन (जर्मनी) येथे झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत (दुहेरी गटात) सुवर्ण पदक प्राप्त केल्यामुळे शिष्यवृत्ती अदा करणेकामी तसेच प्रभाग क्रमांक २४ थेरगाव मध्ये आनंदवन गुजरनगर, मंगलनगर, गणेशनगर व इतर आवश्यक परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ट्रिमिक्स करणे व इतर स्थापत्य विषय़क कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
ड क्षेत्रिय कार्यालयांतर्गत वाकड माध्यमिक विद्यालय या इमारतीचे स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच शिक्षण विभागाच्या इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परिक्षेसाठी उत्तरपत्रिका छपाई करून पुरवठा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेचे फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचे स्वच्छता व देखभाल दुरूस्तीचे कामकाज करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.














