न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे गुरुवारी महा भोंडल्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दरवर्षीप्रमाणे श्रीसुक्त पठाणाने झाली. राष्ट्र सेविका समितितर्फे चालविल्या जाणार्या पौरोहित्य गटाने श्रीसुक्त पठाण केले. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सर्व महिला पारंपरिक वेषभूषेमध्ये नटून आल्या होत्या. सगळ्यांनी भोंडल्याच्या गाण्यांवर ताल धरून फेर धरला. तसेच सर्वजणी उडत्या चालींवर गरबा आणि दांडिया यथेच्छ खेळल्या. कार्यक्रमाची सांगता भोंडल्याच्या खिरापत ओळखणे आणि तिच्या आस्वादाने झाली.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभागाच्या १३५ सभासद उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा पटवर्धन यांनी केले. विभागाच्या सचिव ॲड. हर्षदा पोरे यांनी निवेदने सादर केली व आभार प्रदर्शन केले.













