न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२३) :- पिंपळे सौदागर येथील साई पर्ल सोसायटीमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक मिनाक्षी माने आणि श्रीकांत माने यांच्या नेतृत्वा खाली शुक्रवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात भोंडला खेळातील ” ऐलमा पैलमा गणेश देवा ” या गाण्याने करण्यात आली.
त्यानंतर कारल्याचा वेल लाव ग सूने, श्री कांता कमला कांता, एक लिंबू झेलू बाई अशी अनेक पारंपारिक गीते सादर करण्यात आली. त्यासोबतच विविध भक्तीगीत, भावगीतांनी या कार्यक्रमाची उत्तरोत्तर रंगत वाढत गेली. सोसायटीमधील ज्येष्ठ महिलांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी दुग्धपानाचा आस्वाद घेतला.














