न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२३) :- नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रम व स्पंदन बाल आश्रम, थेरगाव येथील १८ वर्षाखालील १५० मुला-मुलींना दिवाळी सणानिमित्त मुलांच्या मन पसंतीनुसार काळेवाडी येथील जैनम सिलेक्शनमधुन कपडे, खाऊ व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आल्या. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता.
यावेळी मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर पाडाळे, श्री ओम साई मतिमंद मुलांचा आश्रम, भुगाव , स्पंदन बाल आश्रम, थेरगावचे अध्यक्ष मनोज मस्के, उद्योजक उमेश काटे, साद सामाजिक संस्था, विकास पवार, निसार शेख, महेश जाधव, विकास मुंगवडे, कमांडो मनोज साळवी, फ्लाईंग वूमनच्या अध्यक्षा छाया देसले, संस्थेचे सभासद आदी उपस्थित होते.


















