न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२३) :- दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर केलेल्या आतषबाजीमुळे शहरातील विविध १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ११ ठिकाणी घरांना आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला.
जुनी सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड, फुगेवाडी, कासारवाडी, काळेवाडी, भोसरीतील पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. रावेत येथे एका दुकानाला आग लागली होती. चिखलीत चौथ्या मजल्यावरील घराला आग लागली होती. वडमुखवाडीत सलूनच्या दुकानाला आग लागली होती. आकुर्डी, एम्प्यायर इस्टेट येथील सातव्या मजल्यावरील घराला आग लागली होती. पिंगळेसौदागर येथे झाडाला आग लागली होती. मोरवाडीत घराला तर मोशीत एका कंपनीला आग लागली होती. पिंपरी बाजारपेठेतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागली होती. दापोडीत एका घराला आग लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला. सातत्याने येणाऱ्या वर्दीमुळे अग्निशमन विभागाच्या जवानांची मात्र मोठी धावपळ झाली.














