- शास्त्रीय संगीताच्या सुरांनी आणि श्रवणीय भावगीतांनी रसिक मंत्रमुग्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२३) :- ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘देवाचिया द्वारी’, ‘ये ग ये ग रखुमाई’, ‘आवडे हे रूप गोजिरे सगुण’, ‘हेची येळ देवा’ अशा एक से एक बढकर सुरेल भक्तीगीतांच्या रंगात पिंपळे सौदागरकर अक्षरश: न्हाऊन निघाले. निमित्त होते उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित तीन दिवसीय ‘स्वरामृत दिवाळी पहाटचे.’
सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे, पार्श्वगायक अवधूत गांधी, प्रसिद्ध गायक पंडित राजा काळे, गायिका अमिता घुगरी, अंजली गायकवाड आणि नंदिनी गायकवाड यांच्या शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या सुरांनी आणि श्रवणीय भावगीतांनी रसिकांचे कान तृप्त झाले.
दिवाळी पहाट कार्यक्रमास उन्नती सोशल फाउंडेशन तथा भारतीय जनता पार्टी, चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे, उद्योजक संजय भिसे, हभप. संतोष महाराज पायगुडे, हभप. पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदीकर), हभप. शेखर महाराज जांभूळकर, हभप. पवार महाराज, मा. नगरसेवक आप्पा बागल, मा. नगरसेविका निर्मला कुटे, उद्योजक जग्गनाथ काटे, जयनाथ काटे, हभप. विलास काटे, उद्योजक वसंत काटे, राहुल काटे, भानुदास काटे, प्रकाश झिंझुर्डे, बाळासाहेब काटे, राजू भिसे, विजय भिसे, शंकर चोंधे, नवचैतन्य हास्य क्लबचे अध्यक्ष रामभाऊ साळुंखे, लिनिअर गार्डनचे अध्यक्ष सुरेश वाघळकर, बाळासाहेब काटे, डॉ. सुभाषचंद्र पवार, सोसायटीतले सर्व चेअरमन, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास जोशी, रमेश वाणी, राजेंद्र जयस्वाल, गुलाब मेटे, विजू अण्णा जगताप आणि परिसरातील नागरिक तसेच सिनिअर सिटीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप.पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदीकर) यांनी उन्नती सोशल फाउंडेशनचे कौतुक केले. समाजामध्ये डॉ. कुंदाताई संजय भिसे यांचे खूप मोठे काम आहे, अशी लोकं पुढ आली पाहिजेत, असे सांगितले.
डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, दिवाळी आणि फराळाच्या अतूट नात्याप्रमाणेच गेल्या पाच वर्षांपासून दिवाळीच्या पहिल्या दिवशी ‘दिवाळी पहाट’ या सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल परिसरातील नागरिकांना उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनुभवायला मिळते आहे. यंदाही सहाव्या वर्षीदेखील दिवाळी पहाटमध्ये सुप्रसिध्द गायकांची भक्तीगीतं, भावगीतं, तरुणाईला भावणारी गीतं आणि जेष्ठांना चिरतरुण बनविणाऱ्या सांस्कृतिक सप्तसुरांच्या मैफिलीचा आस्वाद घेत परिसरातील नागरिकांनी दिवाळीला सुरुवात केली. दिवाळी पहाट प्रमाणेच दीपावली संध्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. यंदा सहाव्या वर्षीदेखील पिंपळे सौदागरवासीयांची मोठी उपस्थिती कार्यक्रमात होती. प्रसिद्ध गायकांनी त्यांच्या अदाकारीने आणि आपल्या आवाजाने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. रसिकांनी या सुरेल मैफिलीचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.














