न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुणे कॅम्प येथे स्नेहमिलन कार्यक्रम दिपावली व नूतन वर्षानिमित्त एकत्रित येवून साजरा करण्यात आला. त्यावेळी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा व चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.
यावेळी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा या कार्यक्रमास उद्देशून म्हणाले, समाजातील सर्व स्तरावरील सर्वांगीण विकासासाठी युवकांनी पुढाकार घेवून गरजू मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करावी तसेच, संस्था यासाठी सदैव पाठीशी प्रयत्नशील राहील.
यावेळी मुकेश चुडासमा यांनी समाज बांधवांचे विशेष आभार मानले. कार्यक्रम उपस्थित मान्यवर प्रविण वाढीया, लालजी चुडासमा, आदित्य चुडासमा, विपुल वाढीया, करण पढीयार, रमेश पढीयार, महेश पढीयार, प्रतिक सुद्रा, छगन सुद्रा, व्रजलाल सुद्रा, कार्तिक सुद्रा, यश वाढीया, मेघ वाढीया तसेच, महिला जयाबेन वाढीया, कुसुमबेन पढीयार, सविताबेन पढीयार, रंजनबेन चुडासमा, भानु चुडासमा, धर्मिष्ठा वाढीया, भारती वाढीया, हिनल वाढीया, खुशी वाढीया, रेखा सुद्रा, निता सुद्रा, निला काटेलिया आदी उपस्थितांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला.


















