न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- लाकडी दांडके, लोखंडी सळईने मारहाण करत सहा जणांचे टोळके डुकरे भरलेला टेम्पो घेऊन पसार झाले. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास महाळुंगे येथे घडली.
याप्रकरणी किशोर संपत साबळे (वय ३९, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार महेंद्र रीडलान (वय ३१, रा. झेंडेमळा, देहूरोड), समाधान पांडुरंग राठोड (वय ३२, रा. निघोजे, खेड), राम मदन मोठे (वय ३१, रा. खराबवाडी) आणि सोमनाथ अंकुश येळवंडे (वय ४१, रा. निघोजे, खेड) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.