- तरुणाच्या आई वडिलांना धमकावले; गहुंजे क्रीडानगरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- मांडव टहाळयात झालेल्या किरकोळ वादातून आरोपी यांनी फिर्यादीच्या राहत्या घरात घुसून त्यांच्या आई-वडीलांना आरोपी १ याने हातातील कोयत्याचा धाक दाखवला. त्यांना शिवीगाळ करून वडीलांची कॉलर पकडून ‘तूम्हाला लय माज आला आहे? तूमचा मलगा सागर बोडके याचा खून करतो, त्याला जिवंत सोडणार नाही?’ असे म्हणून आरोपी १ याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या घराच्या समोरील खिडकीची काच फोडून नुकसान करून गल्लीत आरडा ओरडा करून दहशतीचे वातावरण निर्माण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २७) रोजी सायंकाळी ५.०० च्या सुमाराम गहुंजे येथे घडला. फिर्यादी सागर जालिंदर बोडके यांनी आरोपी १) विकी शर्मा, २) प्रज्वल मळेकर, ३) करण भिसे व इतर ४ ते ५ अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी ३२९/२०२३ भा.द.वि.क.१४३,१४४,१४७,१४८,१४९,४२७,४५२,५०४,५०६ क्रिमिनल अमेटमेट अॅक्ट क.७, आर्म अॅक्ट ४ (२५), म.हा.पोका क. १३५ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी २ व ३ यांना ताब्यात घेतले आहे. पोना जुंदरे पुढील तपास करीत आहेत.













