- चाकण एमआयडीसीतील वासुलीमधील घटना; स्थानिकांविरुद्ध पोलीसात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- स्व मालकीच्या जमीनीत फिर्यादी व त्यांचा मुलगा हायवा ट्रकद्वारे जमीन भरावासाठी लागत असलेला मुरुम भरुन आणुन टाकत होते. दरम्यान ट्रक खाली करुन परत जात असताना फिर्यादीचे चुलते आरोपी ५ यांनी विकसन न करण्याच्या कारणावरुन ट्रकसमोर मोटार सायकल उभी करुन फिर्यादीचा ट्रक अडवला व ते ट्रक चालकाला शिवीगाळ करु लागले.
फिर्यादी व त्यांचा मुलगा आरोपी ५ यांना समजावुन सांगत असताना फिर्यादीचे चुलत भाऊ व चुलती त्या ठिकाणी आले. आरोपी यांनी त्यांना शिवीगाळ व दामदाटी केली. तसेच हायवा गाडीचा ड्रायव्हर व सुपरवायझर यांना शिवीगाळ व दमदाटी करुन ‘तुम्ही जर यांच्या जमीनीत मुरुम टाकला तर, तुमची गाडी पेटवुन देवु व तुम्हालापण जिवे मारु’ अशी धमकी दिली. तसेच आरोपी १ हा त्याच्या हातातील लोखंडी टॉमी घेऊन फिर्यादीला मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावुन आला व आरोपी २ याने फिर्यादी व त्यांच्या मुलाला काठीने फटके मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हि घटना (दि.२६) रोजी सकाळी ११.०० च्या सुमारास शिंदे गाव, वासुली, ता खेड, जि. पुणे येथे घडली.
फिर्यादी अर्जुन हनुमंत पानमंद यांनी १) विकास जगन्नाथ पानमंद, २) आनंद जगन्नाथ पानमंद, ३) उत्तम जगन्नाथ पानमंद, ४) बेबी जगन्नाथ पानमंद, ५) जगन्नाथ रामचंद्र पानमंद (सर्व रा शिंदे, वासुली, ता.खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ७९३/२०२३ भा.द.वि.क. ४४७,३२३,१४१,१४३,१४७,१४९, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव पुढील तपास करीत आहेत.













