न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची पदोन्नतीने ग्राम विकास विभागातील उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते शासनाकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत नियुक्त होते.
उपायुक्त इंगळे यांनी महापालिकेत सामान्य प्रशासन, उद्यान आणि आकाशचिन्ह विभागाचे कामकाज टप्पाटप्प्याने एकूण ३ वर्षे ५ महिने सांभाळले. ते ७ जुलै २०२० ला महापालिकेत रूजू झाले होते. तर, ७ जून २०२३ ला सहायक आयुक्त म्हणून महापालिकेत रूजू झाले.
विजयकुमार सरनाईक यांची अचानक तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे भूमी, जिंदगी आणि मध्यवर्ती अतिक्रमण विभागाची जबाबदारी होती. पदभार स्वीकारून केवळ सहा महिन्यांतच सरनाइक यांची बदली झाल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.














