न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२३) :- म्हाता-याने जेवण करण्यासाठी फिर्यादीला पैसे मागीतले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास चिडुन ‘तु रोज मला का पैसे मागतो’, असे म्हणाले. त्या कारणावरुन आरोपी क्र १ याने फिर्यादीस ‘तु म्हाता-या मानसावर दादागीरी का करतो’ असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळ करुन ‘थोडा वेळ थांब मी कोण आहे, ते दाखवतो’ असे म्हणुन आरोपी क्र २ ते ४ यांना बोलावुन घेवुन घेतले.
चौघांनी फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीची सासु व पत्नी यांना धक्का बुक्की केली. यातील आरोपी क्र १ याने फिर्यादीकडे बोट करुन याला आज जीवंत सोडायचे नाही, असे बोलुन जवळ असलेला लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीचे डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. यातील आरोपी क्र १ याने लोखंडी कोयता दरवाजावर व खिडकीवर मारुन त्याचे नुकसान करुन, जर का पोलीसात तक्रार केली तर तुम्हा सर्वांना जीवे ठार मारु, असे बोलुन त्याच्या हातातली लोखंडी कोयता भिरकावत दहशत निर्माण केली. आरोपी क्र. ३ याने त्याचे जवळील बीयरची बाटली फिर्यादीच्या पाठित मारली व आरोपी क्र २ व ४ यांनी लाथाबुक्याने मारहान करुन शिवीगाळ केली आहे. फिर्यादी यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. ४) रोजी रात्री ९.३० ते १०.०० च्या दरम्यान भाटनगर, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी आकाश शम्मी सिंह यांनी १) आकाश भुंगा कांबळे, २) संतोष पवार, ३) राज, ४) पवन मेवाते यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. पिंपरी पोलिसांनी ११७८/२०२३ भा.द.वि. कलम ३०७, ४५२, ४२७, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेटमेंट कलम ३ व ७ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि पलांडे पुढील तपास करीत आहेत.












