न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२३) :- हॉटेलच्या नऊ कामगारांच्या पगारातील अंशदान हिस्सातुन रक्कम कपात केली. ती कपात केलेली रक्कम व त्यावरील इतर चार्जसे असे मिळुन ३३,९६८ रुपये भविष्य निर्वाह निधी कार्यालय, पुणे येथे न भरता स्वःताच्या आर्थिक फायदयाकरीता वापरुन कामगाराचा व शासनाचा विश्वासघात करीत सदर रक्कमेचा अपहार केला आहे.
हा प्रकार सन डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२३ या कालावधीत वायरोका हॉटेल्स (रमाडा) मुंबई बँगलोर हायवे, छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस कॉम्पलेक्स, बालेवाडी, पुणे येथे घडला.
याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी (१) वैभव लांबा, (डायरेक्टर), (२) शरद श्रीमंत यादव (डायरेक्टर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात १३५८/२०२३ भा.द.वि. कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि खटाळ पुढील तपास करीत आहेत.












