- आपच्या यलप्पा वालदोर यांची अति. आयुक्तांकडे मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२३) :- “दापोडी फुगेवाडी भागात लावण्यात आलेले CCTV कॅमेरा हे चालू आहेत की नाही? आणि उड्डाणपूलाजवळ लावलेला कॅमेरा यांची दिशा बदलण्यात यावी”, अशी तक्रार मार्च 2022 रोजी पहिल्या जनसंवाद सभेत आम आदमी पार्टीचे माहिती अधिकार आघाडी अध्यक्ष यल्लापा वालदोर यांनी ह क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकऱ्यांसमोर मांडली होती. त्यावर कार्यवाही झाली नाही.
महापालिका आयुक्तांकडे देखील त्यांनी मेलद्वारे यासंबंधित विषयाचा पाठपुरावा केला होता. तब्बल वीस महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. जनसंवाद सभा म्हणजे फक्त एक चर्चा करण्याचे ठिकाण झाले आहे. काम करताना कोणीही दिसत नाही. राजकीय प्रतिनिधींचे हे हाल असतील तर, सामन्यांची काय अवस्था असेल?
आयुक्तांनी ह-क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिलेली तक्रार पूर्ण न करणारे संबंधित जनसंवाद अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायदा 2006 नुसार कारवाई करण्यात यावी, असे निवेदन यल्लापा वालदोर यांनी महापालिककेचे अतिरिक्त आयुक्त यांना दिले आहे.












