न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२३) :- महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने खेचुन जबरी चोरी करणारे आरोपी व चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारांना गुन्हे शाखा युनिट ४ कडुन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चैन स्नोंचिंग १३, वाहन चोरीचे ०१ असे एकुण १४ गुन्हे उघड करण्यात आले असून १६,३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगवी येथे एक महिला आणि तिचा पती हे सकाळी ०६:२० च्या दरम्यान मॉर्निंग वॉक करत असताना एका काळया रंगाचे प्लसर मोटार सायकलवरुन आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. या घटनेनंतर काही वेळातच कासारवाडी येथे देखील एका महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना लागोपाठ घडली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळापासुन आरोपी गेलेल्या मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून गुन्ह्याचा छडा लावला.
आरोपी आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार याला ताब्यात घेतले आहे. त्याने पाहिजे आरोपी महादेव ऊर्फ महाद्या ऊर्फ अजय गौतम थोरात याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने आरोपी अक्षय अशोक मुरकुटे व धिरज गोपाळ गवळी यांच्यामार्फत त्याची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. तसेच चोरीचे दागिने घेणारे खडकीतील दोन ज्वेलर्स आरोपी गणपत जवाहरलाल शर्मा, दर्शन रमेश पारिख यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हयातील एकुण-२५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे स्वप्ना गोरे मॅडम, सपोआ, गुन्हे सतिश माने, सपोआ बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सपोनि सिद्धनाथ बावर, पोउपनि गणेश रायकर, पोउपनि आबासाहेब किरनाळे सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, पोहवा/ प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.