- संजोग वाघेरे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार सचिन अहीर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांचे शिवबंधन बांधून स्वागत केलं. संजोग वाघेरे यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताना सर्व नेत्यांचे आभार मानले. मावळचे सर्व सहकारी आणि पिंपरी चिंचवडच्या पदादिकाऱ्यांचं स्वागत करतो. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या साथीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी खंबीरपणे मार्गदर्शन केलं. माझी जबाबदारी माझं कुटुंब ही मोहीम उद्धव ठाकरे यांनी सुरु केली होती त्यावेळी भावूक झालो होतो, असं संजोग वाघेरे म्हणाले.
देशात महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्या आहेत. संविधानाच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांनी चुकीची भूमिका घेतली आहे. आपण शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करायचं, असं ठरल्याचं संजोग वाघेरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व मितभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणार नेतृत्त्व असल्याचं जाणवलं, असं संजोग वाघेरे म्हणाले. मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा विश्वास देतो, असं संजोग वाघेरेंनी सांगितलं.