- राज्यभरातून मोठ्या संख्येने तेली बांधव आणि भक्त परिवाराची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२३) :- तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवारी (दि. ०३) रोजी सोहळ्याला प्रारंभ होणार असून बुधवारी (दि. १०) रोजी काल्याच्या कीर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहभर सोहळ्यात काकड आरती, महापुजा, अभिषेक, गाथा पारायण, प्रवचन, हरीपाठ, कीर्तन, जागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास राज्यभरातून मोठ्या संख्येने तेली बांधव आणि भक्त परिवार सुदुंबरे येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली.
उद्या बुधवारी (दि. ०३) रोजी सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल कालिदास गाडे, उपसरपंच बापूसाहेब बोरकर आणि सदस्यांच्या हस्ते संताजी महाराजांची पूजा आणि अभिषेक होणार आहे. त्यानंतर सप्ताहभर काकड आरती, महापुजा, अभिषेक, गाथा पारायण, प्रवचन, हरीपाठ, कीर्तन, जागर सुरु राहणार आहे. मंगळवारी (दि. ०९) रोजी श्री क्षेत्र देहू संस्थानचे माजी अध्यक्ष हभप रामदास नाना महाराज मोरे यांचे आणि (दि. १०) रोजी देविदास महाराज मिसाळ यांच्या सुश्राव्य वाणीने काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.
दरम्यान श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास मनोहर उबाळे, श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे अध्यक्ष नारायण दिगंबर क्षिरसागर, विजय शंकरराव रत्नपारखी (कार्याध्यक्ष), पोपटराव किसन पिंगळे (उपाध्यक्ष), विजयकुमार लक्ष्मण शिंदे (उपाध्यक्ष), अॅड. राजेश केशव येवले (मुख्यचिटणीस), दत्तात्रय रंगनाथ शेलार (खजिनदार), पंडीत सदाशिव पिंगळे (चिटणीस शिक्षण समिती), भिकाजी केशव भोज (अंतर्गत हिशोब तपासणीस), लक्ष्मण गेणभाऊ शेलार (चिटणीस), विजय किसन रत्नपाररखी (सह-खजिनदार), प्रशांत चंद्रकांत भागवत (चिटणीस), सतिश भालचंद्र वैरागी (चिटणीस), शैलेश सहदेव मखामले (चिटणीस), विमल सतिश वाव्हळ (महिला चिटणीस), अरुण कोंडिबा काळे (विश्वस्त), श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे गंगाधर काशीनाथ हाडके (उपाध्यक्ष), अरविंद रामचंद्र रत्नपारखी (सचिव), मनोहर माधवराव जाधव (स्वजिनदार), ताराचंद हरिभाऊ देवराय (विश्वस्त), बनारसी धोंडिबा राऊत (विश्वस्त), लक्ष्मण गेणभाऊ शेलार (विश्वस्त), कोंडिबा गणपत दिवेकर (विश्वस्त), विश्वास हरिभाऊ डोंगरे (विश्वस्त), प्रदिप पुरुषोत्तम वाव्हळ (विश्वस्त), बाळासाहेब नथोबा बाळुंजकर (विश्वस्त), शंकर केशव काळे (विश्वस्त), जयश्री सुरेश राऊत (विश्वस्त), उल्हास पांडुरंग वालझाडे (विश्वस्त), उत्सव अध्यक्ष सौरभ भागवत, उत्सव उद्घाटक सौरभ रत्नपारखी, मंदिर व्यवस्थापक चंद्रकांत जाधव आदींच्या सहभागातून या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. भाविक भक्तांनी उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.













