न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२३) :- भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यास येणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सोमवारी (दि. १) रोजी मोफत पाण्याचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या सुचनेनुसार शहर उपाध्यक्ष विकास कांबळे यांच्या पुढाकारातून कोरेगाव भीमा येथे आलेल्या भीम अनुयायांना तब्बल दीड हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रहाटणी प्रभाग अध्यक्ष सचिन साळवे, सौरभ कांबळे, सुमित निकाळजे, प्रणव कांबळे, ऋषिकेश कांबळे,अभिजित साळवे, अक्षय कांबळे,
प्रतीक साळवे, मयूर खरात, अर्शद शेख, शाहीद शेख व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.

















