- माजी मंत्री बाळा भेगडे यांचा संकल्प..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२४) :- भविष्यात वडगाव फाट्यावरून तळेगावमध्ये प्रवेश करताना मानस माजी मंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानकडून वडगाव फाट्यावरील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, असे नामकरण करण्यात आले. या फलकाच्या उद्घाटन प्रसंगी भेगडे बोलत होते.
यावेळी आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्षा श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश खांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील, अध्यक्ष सुबोध दाभाडे, रविंद्र दाभाडे, माजी सभापती गुलाब महाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, तळेगाव शहर भाजप अध्यक्ष अशोक दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील दाभाडे, माजी अध्यक्ष अण्णासाहेब दाभाडे, विलास काळोखे, माजी नगरसेविका शोभा भेगडे, रजनी ठाकूर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नाव कायम होण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तसेच सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदर चौकाच्या सुशोभिकरणासाठी मदत करण्याची ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी यावेळी बोलताना दिली.
प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे, अध्यक्ष सुबोध दाभाडे, कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, निलेश दाभाडे, दिपक दाभाडे आणि सहकाऱ्यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले. अॅड. विनय दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले.













