न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२४) :- शिक्षक सेना समन्वयक सुनील जगताप व मुख्याध्यापक एकनाथ आंबले यांच्या विरुद्ध महिला शिक्षिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात विनयभंग, ॲट्रॉसिटीसह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत वडमुखवाडी परिसरात राहणाऱ्या महिला शिक्षकेने फिर्याद दाखल केली आहे .मुख्य आरोपी एकनाथ आंबले हा पीडित महिला शिक्षिकेचा पूर्वाश्रमीचा मुख्याध्यापक असून त्याने सुनील जगताप याला हाताशी धरून संगणमताने ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्यासाठी २०१९ पासून पीडित महिलेच्या शिक्षक पदाची वेतन बंद करण्यासाठी शिक्षण खात्यामध्ये खोटी तक्रारी केली होती. पीडित महिला शिक्षिकेवर वाईट उद्देशाने वाईट नजर ठेवून आरोपी पाठलागही करत होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडित महिला शिक्षिका दि .३०.१२.२०२३ रोजी सायं ५:१५ वा शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना खडीमशीन चौकातून अलंकापुरम रोडवर सायंकाळी सहा वाजता आरोपी एकनाथ आबले व सुनील जगताप यांनी दुचाकी आडवी लावली. त्यावेळी आरोपी सुनील जगताप यांनी अर्वाच्य भाषेत बोलून धमकी दिली की , ” मी तुझी शिक्षण खात्यामध्ये तक्रार केली आहे ,शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यासमवेत माझे जवळचे संबंध असून त्यांना सांगून मी तुझी दोन दिवसात नोकरी घालू शकतो .तुझी नोकरी टिकवायची असेल तर वीस लाख रुपयांची सोय कर, असे म्हणत वीस लाखाची खंडणी मागितली. तसेच आरोपी सुनील जगताप व एकनाथ आमले यांनी पीडित महिला शिक्षिकेस अश्लीश वर्तन करून अश्लीश भाषा वापरली व जातिवाचक शिवीगाळ केली असे फिर्यादित नमूद केले आहे .
फिर्यादीनुसार आरोपी सुनील जगताप व एकनाथ आमले यांच्याविरुद्ध भादवि कलम ३५४ ,३५४- ड ,३८४ ,३४१ ,५०४ व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक )अधिनियम 1989 अन्वय दिघी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर करत आहेत.