न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२४) :- चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या सन २०२४ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघटनेचे पदाधिकारी तसेच जेष्ठ उद्योजक यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १५) रोजी उद्योजक राम काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
या प्रसंगी चाकण MIDC ऊद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे, संचालक प्रवीण शिंदे, संचालक नंदकुमार सावंत, ज्येष्ठ उद्योजक दिलीप देशमुख, सल्लागार लक्ष्मण काळे, संघटनेचे सभासद उद्योजक कल्याण बाबर, निखिल शिंदे, निखिल देशमुख, विवेक राठोड, कौस्तुभ मुरुडवार, सिद्धार्थ राणे, पांडुरंग दगडे, बालाजी दगडे, राहुल शितोळे, CA ऋषिकेश खळदकर आदी सभासद उपस्थित होते.
या दिनदर्शिकेमध्ये चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या संपुर्ण कार्याची माहिती दिलेली आहे. या दिनदर्शिकेचे वितरण हे संपूर्ण चाकण MIDC परिसर तसेच भोसरी MIDC मध्ये देखील करण्यात आले आहे, अशी माहिती चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी दिली.