न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- काम करत असलेल्या कंपनीतील सुपरवायझर आरोपीने फिर्यादी यांना टार्गेट पूर्ण करुनसुध्दा घरी मोकळीक न करता आणखी दोन तास काम करण्यास सांगितले. ते काम लवकर पूर्ण करण्यासाठी घाई गडबड केली.
दरम्यान फिर्यादी यांचा उजवा हात फिर्यादी हे काम करत असलेल्या हायड्रोलीक प्रेस मशीनमध्ये गेल्याने फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या मनगटापासुन पुढील हात मशीनमध्ये जावुन कट झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १६) रोजी सायं ५.०० च्या सुमारास खेड तालुक्यातील आंबेठाण येथील सुवीआरएम मेटाझाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडला.
फिर्यादी दिनेश महादेव शर्मा (वय २९ वर्षे) यांनी आरोपी प्रुफुल्ल राठोड याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ४०/२०२४ भादवि कलम, ३३८ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि मोरे पुढील तपास करीत आहेत.














