न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२४) :- इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज अतिशय कमी असतो. त्यामुळे अनेक वेळा वाहन जवळ आले तरी त्याचा फारसा आवाज होत नाही आणि अपघाताचा धोका निर्माण होतो.
त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ई-वाहनांचा आवाज वाढविण्यात येणार आहे. याला केंद्र सरकारनेही हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी गुरुवारी दिली.











