न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२४) :- एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी-चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे. संसार आणि अभ्यास अशी कसरत करून तिने हे यश संपादन केल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे.
पूजाला तिच्या पतीचा पाठिंबा मिळाला. एक वेळ स्वयंपाक राहू दे मात्र अभ्यास कर, असं तिच्या पतीने ठणकावून तिला सांगितलं. स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, असं पूजा म्हणाली.











