न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२४) :- आकुर्डी येथील भंगार मालाच्या दुकानास शुक्रवारी (दि. १९) रोजी सायंकाळी ७:०० वाजता आग लागल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच वाहनांच्या साह्याने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविण्यात आली.
रात्रीच्या वेळेस दाट वस्ती व मुख्य रस्ता असल्याने परिसरामध्ये वर्दळ होते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दल व पोलिसांना कळविले सुदैवाने आगेमध्ये कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही.
भंगार मालाच्या दुकानात स्वयंपाक करत असताना गॅस गळती झाल्याने भडका होऊन लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. पोपट आडसूळ ( वय ५०), संतोष चव्हाण (४५), श्रीकांत कांबळे (३२) आणि नरेश चव्हाण (३८) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी पोपट २० टक्के तर संतोष हे ३५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.











