ही बाब महाराष्ट्र राज्यासाठी व देशासाठी भूषणावह – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२४) :- नुकताच श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा आयोध्येत दिमाखात संपन्न झाला. प्रभू रामललाची पूजा व स्थापना झाल्यानंतर आयोध्यावासीयांसोबत संपूर्ण देशभरात हर्षउत्सव साजरा झाला. भाषणा दरम्यान “आचार्य गोविंदगिरींनी छत्रपती शिवरायांचा आदरयुक्त नामोउल्लेख केला. त्यांच्या कार्याचा महिमा आदरयुक्त पद्धतीने कथन केला, निश्चितच ही बाब महाराष्ट्र राज्यासाठी व देशासाठी भूषणावह आहे, असे मत प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील व्यक्त केले.
ते म्हणाले, अनेक वर्षांपासून जनसामान्यांसोबत लढण्याऱ्या संघटना तसेच साधू-साध्वी, शंकराचार्य, पिठाधिश, आखाडे प्रमुख,न्यास, संत, महात्मे, मंदिर प्रमुख, परिषदेचे नेते, संघ – कारसेवक कार्यकर्ते,कायदेतज्ञ,उद्योजक, कलाकार हे नेत्रदीपक सोहळ्यामुळे सुखावले.अनेक वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. या सोहळ्याला देश विदेशातून प्रमुख अतिथींना आमंत्रीत करण्यात आले होते. या परिसरात विचार दहा हजार पेक्षा जास्तआमंत्रित प्रमुख भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामध्ये देशातील प्रमुख उद्योजक, पक्ष प्रमुख, पक्ष नेते, कलाकार,संगीतकार ,सर्व धर्मीय संत महात्मे, आचार्य , राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल अश्या विख्यात गण मान्यांसमोर ठराविक कार्यक्रम प्रमुखांची भाषणे झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समवेत आचार्य गोविंदगिरीचें भाषण विशेषतः चर्चेत राहील असे झाले. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरयुक्त आणि भावनाप्रधान नामोउल्लेख केला. त्यांच्या दृष्टिकोनात छत्रपतींनी दक्षिण दिग्विजय स्वारीरील एका प्रासंगिक घटनेचा उल्लेख केला, उल्लेख करत असताना त्यांनी राजा कसा असावा याबद्दल गौरवउद्गार काढले. जगाच्या तसेच देशातील बहुतांशी प्रसारमाध्यमांचे या ऐतिहासिक घटनेकडे व त्यांच्या भाषणाकडे लक्ष्य होते. कोट्यावधी जनता ह्या प्राणप्रतिष्ठा सोहळा जिवंत पाहत होती. अनेक प्रमुख अतिथी त्यांच्या भाषणाचे साक्षीदार होते. एवढ्या मोठ्या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे पडघम संतांच्या मुखातून बाहेर पडले. यामुळे राज्यातील कोट्यवधी मराठी जनतेसाठी नक्कीच अभिमानास्पद तसेच गौरवास्पद बाब ठरली. त्यांच्या भाषणामध्ये तसा अभिव्यक्तीपना दिसून येतो.











