न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२४) :- परभणी ते मुंबई मराठा आरक्षणासाठी सायकल वारी करणाऱ्या परभणी येथील संदीप गव्हाणे व गजानन देशमुख या दोन तरुणांचा देहूगांव येथे राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार असल्याचे दोघांनी सांगितले.
परभणी येथून हे दोघेजण मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनात सायकलवर जात असताना देहूगांव येथे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय धर्म हिंदू संघटनचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष हंसराज पाटील, उपाध्यक्ष महेश सुरवसे, सचिव दिपक चव्हाण, गोपाळ भालेराव पाटील, गणेश कुलकर्णी, अरविंद वाघुले, ओंकार भालेराव, एकनाथ भालेराव, निवृत्ती राजगोरे, माऊली राजगोरे, कुणाल भालेराव, बंटी भालेराव, योगेश भालेराव आदी उपस्थित होते.











